विपश्यना साधना

विपश्यना, म्हणजे जे जसे खरोखरी आहे, तसे त्याला पाहणे. विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी तिला पुन्हा शोधून काढली आणि सार्वत्रिक रोगांसाठी सार्वत्रिक उपाय, अर्थात जीवन जगण्याची कला ह्या रूपात सर्वांना सुलभ अशी बनविली. i.e., an जिवन जगण्याची कला. ह्या असांप्रदायिक(सार्वजनीन) ध्यानपद्धतीचे मुख्य लक्ष्य म्हणजे मानसिक अशुद्धता पूर्णत: काढून टाकणे आणि परिणामी संपूर्ण मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे हे आहे.

विपश्यना ही आत्म-निरीक्षणाद्वारे स्व-परिवर्तन करण्याचा एक मार्ग आहे. हे मन आणि शरीरामध्ये असलेल्या खोल आंतरिक संबंधावर लक्ष केंद्रित करते, जी थेट शरीराच्या चेतना निर्माण करणाऱ्या भौतिक शारीरिक संवेदनांवर शिस्तीने लक्ष देऊन अनुभविली जाऊ शकते आणि ही मनाच्या चेतनेला सतत परस्पर संबंध आणि स्थितिमध्ये ठेवते. मन आणि शरीराच्या सर्वसाधारण मूळस्वरुपावर हे निरीक्षण-आधारित, स्वयं-अन्वेषणात्मक प्रवास आहे, जे मानसिक अशुद्धता वितळविते आणि परिणामस्वरूप प्रेम आणि करुणायुक्त संतुलित मनानध्ये परिवर्तित होते.

आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदना ज्या वैज्ञानिक नियमानुसार चालतात ते सिद्धांत स्पष्ट होऊ लागतात. आपल्या प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला समजते की, विकार कसे उत्पन्न होतात, बंधने कशी बांधली जातात आणि त्यापासून कशी मुक्तता मिळू शकते. जागृतता, भ्रांतीमुक्तता, स्व-नियंत्रण आणि शांतता हे जीवनाचे गुणधर्म बनून जातात.

परंपरा

बुद्धांच्या काळापासून, विपश्यना आजच्या दिवसापर्यंत, अज्ञात आचार्यांच्या अखंड श्रृंखलेद्वारे हस्तांतरीत करण्यात आली आहे.  भारतीय वंशज असलेल्या, या श्रृंखलेतील वर्तमान आचार्य, श्री. एस. एन. गोयेंकाचा जन्म बर्मा (म्यानमार) येथे झाला आणि तेथेच वाढले. तिथे राहत असताना त्यांचे आचार्य, सयाजी ऊ बा खिन जे त्यावेळी उच्च सरकारी अधिकारी होते, यांच्याकडून विपश्यना शिकण्याचे चांगले भाग्य मिळाले. चौदा वर्षे आपल्या आचार्यांकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर श्री गोयन्का यांनी भारतात स्थायिक होऊन 1 9 6 9 पासून विपश्यना शिकविण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सर्व वंशांतील आणि धर्मातील दहा पट हजारो लोकांना शिकवले. 1 9 82 मध्ये  विपश्यना साधना शिबिरांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आचार्यांची नेमणूक करण्यास सुरवात केली.

शिबीरे

विपश्यना साधनेचे तंत्र दहा दिवसांच्या निवासी शिबीरांत शिकवले जाते, ज्यामध्ये भाग घेणार्‍या साधकांनी नेमून दिलेली अनुशासन संहिता पालन करणे, Code of Discipline साधनेच्या मूलभूत पद्धति समजून घेणे, तसेच त्याचा लाभदायक अनुभव घेण्यासाठी योग्य प्रमाणात अभ्यास करणे.

शिबीरामध्ये कष्टाने, गंभीरपणे काम करण्याची आवश्यकता आहे. प्रशिक्षणाच्या एकूण तीन पायर्‍या आहेत. त्यातली पहिली म्हणजे शिबीरकाळात हिंसा, चोरी, लैंगिक आचरण, असत्य भाषण आणि मादक पदार्थांचे सेवन यांपासून दूर राहणे. नैतिक वर्तणुकीच्या ह्या साध्या शीलांमुळे मन शांत होते, जे अन्यथा अस्थिर होऊन स्व-निरीक्षणाचे कार्य करण्यासाठी सक्षम राहत नाही. पुढली पायरी म्हणजे आपले लक्ष नैसर्गिक रित्या नाकपुडीत येणाऱ्या व जाणाऱ्या बदलत्या श्वासाच्या प्रवाहाकडे लक्ष केन्द्रित करुन मनाला वश करण्याची कला विकसित करणे. चौथ्या दिवसापर्यंत मन काहीसे शांत व एकाग्र झालेले असते, आणि प्रत्यक्ष विपश्यना साधना सुरू करण्यासाठी सक्षम झालेले असतेः अर्थात शरीरावरील संवेदनांचे निरीक्षण करणे, संवेदनांचा खरा स्वभाव समजून घेणे तसेच त्यांच्या प्रती प्रतिक्रिया न देता समता विकसित करणे. अंतिमतः शेवटच्या दहाव्या दिवशी शिबीरार्थी सर्वांप्रती करूणा किंवा सदभावना म्हणजेच ’मंगल मैत्री’ ची साधना शिकतात, की ज्यामध्ये सर्व प्राणीमात्रांना शिबीरांतर्गत निर्माण झालेल्या पुण्याचे भागीदार बनवले जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया वस्तुत: एक मनाचा व्यायामच आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच सुदृढ मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होऊ शकतो.

ही साधना खरोखरीच सहाय्यकारक असल्याचे लक्षात आल्याने ती तिच्या मूळ, शुद्ध व प्रामाणिक स्वरूपात ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळेच ती व्यापारीकरणापासून मुक्त आहे. ती शिबीरासाठी येणाऱ्याना विनामोबदला शिकविली जाते. साधना शिकवणार्‍या कोणत्याही आचार्यांना त्यासाठी कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. शिबीरासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही- अगदी खाणे-पिणे आणि राहण्याचे सुद्धा नाही. सर्व खर्च हा ज्या साधकांनी शिबीर समाधानकारकरित्या पूर्ण केले आहे व ज्यांना आपल्याला मिळालेला लाभ आपल्यानंतर येणार्‍यांनाही मिळावा असे वाटले, त्यांनी केलेल्या ऐच्छिक दानातून भागवला जातो.

अर्थातच साधनेचे सुपरिणाम अभ्यासाच्या निरंतरतेनंतर हळूहळू दृष्टीस पडतात. दहा दिवसात सर्व समस्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा करणे अवास्तविक आहे. परंतु ह्या काळात विपश्यनेची मूलभूत रूपरेषा शिकता येते, जी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आचरणांत आणता येते. साधनातंत्राचा अभ्यास जितका अधिक, तितकी दुःखापासून अधिक मुक्ति होईल, आणि तितके अधिक आपण आपल्या परममुक्तीच्या अंतिम लक्षापाशी जाऊ. अर्थात् दहा दिवसांची साधना सुद्धा असे परिणाम देऊ शकते, जे स्पष्टपणे दिसतील आणि दैनंदिन जीवनात लाभ मिळणे चालू होइल.

गंभीरतापूर्वक अनुशासनाचे पालन करणाऱ्या सर्व लोकांचे विपश्यना शिबीरात स्वागत आहे, जे स्वानुभूतीच्या आधारे ह्या साधनेचे लाभ स्वत: अनुभवू शकतात. जे गंभीरतापूर्वक प्रयत्न करतील, त्यांना विपश्यना हे जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी एक प्रभावशाली तंत्र प्राप्त होइल.