विपश्यना
सत्यनारायण गोयन्का द्वारा जशी शिकविली जाते
साधना
सयाजी ऊ बा खिन च्या परंपरेत
विपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे
शिबीराचा अवधी १० दिवस का असतो?
वास्तविक १० दिवस सुद्धा ह्या शिबीरासाठी कमीच आहेत ; ज्यामध्ये ह्या साधना विधीची केवळ ओळख व पायाभरणी होते. त्याचा विकास, हे तर आयुष्यभराचे कार्य आहे. विपश्यना ध्यानसाधनेच्या पिढ्यान्पिढ्यांच्या अनुभवानंतर असे जाणवले की, १० दिवसांपेक्षा कमी अवधी ठेवल्यास शिबीरार्थी विपश्यना साधना अनुभवाच्या स्तरावर प्रत्यक्ष ग्रहण करू शकत नाहीत. परंपरेनुसार विपश्यना साधना सात आठवड्यांच्या शिबीरांमध्ये शिकविली जात असे. २०व्या शतकाच्या उदयानंतर, ह्या परंपरेच्या आचार्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, कमीत कमी दिवसामध्ये विपश्यना साधना शिकवण्याचा प्रयोग केला. त्यांनी तीस दिवस, दोन आठवडे, दहा दिवस, अगदी सात दिवसापर्यंतचे प्रयोग केले आणि त्यांना आढळले की मन स्थिर होण्यास आणि देह-मनाच्या संबंधांचा गंभीरपणे अभ्यास करण्यास दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी पुरेसा ठरत नाही.
दिवसातले किती तास ध्यानसाधना असेल?
पहाटे चार वाजता उठण्यासाठी होणार्या घंटेबरोबर सुरू झालेला दिवस रात्री ९ वाजता संपतो. संपूर्ण दिवसभरात सुमारे दहा तासांची ध्यानसाधना असते, ज्यामध्ये अधून मधून काही ठराविक सुट्टी व विश्रांतीसाठी वेळ दिला जातो. रोज संध्याकाळी सात वाजता आचार्य श्री. स. ना. गोएंका यांचे वीडियोवर प्रवचन लावले जाते, ज्यामधील संदर्भामुळे साधकांना त्या त्या दिवसाचा त्यांचा अनुभव समजण्यास मदत होते. ही समयसारिणी योग्य असल्याचे व गेली काही दशके शेकडो, हजारो साधकांना लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.
शिबिरामध्ये कोणत्या भाषेचे माध्यम वापरले जाते?
श्री. स. ना. गोएंका यांनी इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये पूर्वामुद्रित केलेल्या प्रवचनांसोबत त्यांचे स्थानिक भाषांमधले भाषांतरही लावले जाते. इंग्रजी सोबतच जगातल्या प्रमुख भाषांमधली मुद्रित भाषांतरेही उपलब्ध आहेत. जर शिबिर संचालन करणाऱ्या आचार्यांना स्थानिक भाषा नीटपणे अवगत नसेल, तर मदतीसाठी दुभाषा उपलब्ध असेल. ज्याला खरोखर शिबीर करायचे आहे, त्याच्यासाठी भाषा सहसा अडथळा ठरत नाही.
शिबिरासाठी खर्च किती येतो?
शिबिरात आलेल्या प्रत्येक साधकाचा खर्च हा अगोदरच्या शिबिरार्थी कडून दान स्वरूप मिळालेला असतो. साधना शिकवण्यासाठी किंवा जेवणासाठी किंवा राहण्यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही. जगभरातली सर्व विपश्यना शिबिरे संपूर्णत: ऐच्छिक देणग्यांवर घेतली जातात. शिबीर पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला आलेल्या अनुभवांचा काही फायदा झाला असेल, तर येत्या शिबिरासाठी आपल्या इच्छेप्रमाणे व ऐपतीप्रमाणे देणगी देण्यास आपले स्वागत असते.
शिबीर घेण्यासाठी आचार्यांना किती मानधन दिले जाते?
आचार्यांना कोणतेही मानधन, देणगी अथवा भौतिक लाभ दिला जात नाही. त्यांना त्यांच्या चरितार्थासाठी स्वत:चे वैयक्तिक उत्पन्नाचे साधन असणे अपेक्षित असते. ह्या नियमामुळे कदाचित काही आचार्यांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळत असला, तरी ह्या नियमामुळे शिबीरार्थींचे शोषणापासून रक्षण होते आणि साधनेचे व्यावसायिकरण होण्यापासून बचाव होतो. ह्या परंपरेमध्ये आचार्य केवळ सेवाभावाने विपश्यनेचे दान करतात. शिबीराच्या समाप्ती नंतर साधकांना होणारा आनंदच त्यांचे पारिश्रमीक असते, (समाधान असते)
मी मांडी घालून बसु शकत नाही. तरीही मी साधना करू शकेन का?
निश्चीतच. जे वयामुळे अथवा काही शारिरीक कारणांमुळे जमिनीवर बसु शकत नाहीत त्यांच्यासाठी खुर्च्या उपलब्ध असतात.
मला विशेष जेवणाची आवश्यकता आहे. मी स्वतःचे जेवण आणू शकतो का?
जर आपल्याला डॉक्टरानी विशेष जेवण सांगितले असेल तर आम्हाला तसे कळवावे. आम्ही ते जेवण उपलब्ध करू शकतो का हे पाहू. जर जेवण अतिशय विशेष असेल अथवा साधनेमध्ये बाधा उत्पन्न करणारे असेल, तर आम्ही आपल्यास जेवणाचे निर्बंध कमी होईपर्यंत थांबण्याची विनंती करू शकतो. ह्याबद्दल आम्ही क्षमा मागतो परंतु साधकांना स्वतःचे जेवण न आणता, व्यवस्थापनाद्वारे दिल्या गेलेल्या भोजनातूनच आपले भोजन प्राप्त करावे लागेल. अधिकतर साधकांना उपलब्ध भोजनाचे पर्याय पुरेसे आहेत असे आढळते आणि ते साध्या शाकाहारी भोजनाचा आनंद घेतात.
गर्भवती स्त्रिया शिबीरामध्ये भाग घेऊ शकतात का? त्यांच्यासाठी काही विशेष व्यवस्था अथवा सूचना आहेत का?
गर्भवती महिला निःसंशयपणे शिबीरामध्ये भाग घेऊ शकतात. कित्येक गर्भवती महिला खासकरून शिबीरामधे सम्मिलित होण्यासाठी येतात, ज्यायोगे त्या अशा विशेष समयी मौन साधून गंभीरतापूर्वक साधना करण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकतात. आम्ही गर्भवती स्रियांना निवेदन करतो की शिबीरामध्ये सम्मिलित होण्यापूर्वी आपण गर्भ स्थिर असल्याचे निश्चीत करावे. गर्भवती स्रियांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पर्याप्त मात्रेमध्ये भोजन दिले जाते तसेच त्यांना आरामपूर्वक साधना करण्यासाठी सांगितले जाते.
शिबीरामध्ये मौन का असते?
शिबीरात हजर असणारे सर्व साधक “आर्य मौन” चे पालन करतात—म्हणजेच, शरीर, वाणी व मनाची शांतता. त्यांना सहाध्यायी साधकाबरोबर सम्पर्क साधण्यास मनाइ असते. तरीसुध्दा, साधक त्यांना भौतिक आवश्यकतेसाठी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य आहे, व प्रशिक्षकाशी बोलू देखील शकतात. मौन पहिल्या संपुर्ण नउ दिवसासाठी पालन करावे लागते. दहाव्या दिवशी पुर्ववत सर्वसाधारण जिवन स्थापित करण्यासाठी बोलण्यास आरंभ होतो. अभ्यासाची निरंतरता हेच ह्या शिबीराच्या यशस्विततेचे रहस्य आहे; ही निरंतरता राहावी यासाठी मौन हे अत्यावश्यक आहे.
मी साधना करु शकेल याची खात्री काय?
ज्याला खरोखरच आस्था आहे आणि मनापासून प्रयत्न करणार असाल तर अशा माफक शरिरीक आणि मानसिक स्वास्थ असलेल्या व्यक्तीस, साधना ( आर्य मौनासहित ) करणे कठीण नाही. जर आपणास दिलेल्या सुचना धैर्याने आणि दक्षतेने पाळणे शक्य झाल्यास आपण खऱ्या परिणामाबद्दल निश्चिंत रहा. दैनंदिन समयसारिणी जरी भितीदायक वाटली तरीसुध्दा ती कडक नाही की शिथील नाही. शिवाय शांततापुर्ण आणि उपयुक्त वातावरणात नेकीने साधना करणाऱ्या दुसऱ्या साधकांची उपस्थिती एकाद्याच्या प्रयत्नाला प्रचंड सहाय्य करते.
शिबीरात कुणी भाग घेऊ नये असे आहे का?
प्रत्यक्षांत समयसूची पाळण्यास शारिरीकदृष्ट्या दुर्बळ असेल तर त्याला शिबीरापासून फायदा मिळणार नाही. मनोविकार दुखणे भोगत असलेल्या व्यक्तिबाबत हेच सत्य असेल, किंवा जो कुणी भावनिक चढउतार अनुभवत असेल अशांना देखील हे लागू आहे. प्रश्न-उत्तराच्या पध्दतीनुसार तुम्हाला शिबीरापासून पुर्ण फायदा मिळेल किंवा कसे याचा निर्णय आधीच घेणे आम्हाला शक्य होईल. काही बाबतीत अर्जदाराला प्रवेश देण्याआधी आम्ही त्यांच्या डॉक्टरांची अनुमती आणण्यास सांगतो.
विपश्यना शारिरीक किंवा मानसिक आजार बरे करते काय?
पुष्कळसे रोग आपल्या मनांतील अंतस्थ प्रक्षुब्धतेमुळे उत्पन्न होतात. जर प्रक्षुब्धता दूर केली तर रोग कमी होतील किंवा नाहीसे होतील. परंतू रोगाना बरे करण्याच्या उद्देशाने विपश्यना शिकायला आलात तर ती चुक आहे व कधीच यशस्वी होणार नाही. जे लोक असे करण्याचा प्रयत्न करतात ते आपला वेळ वाया घालवतात कारण ते चुकीच्या लक्षावर केंद्रीत करतात. ते आपले नुकसान सुध्दा करु शकतात. ते योग्यरितीने साधना तर समजू शकणारच नाहीत पण रोगमुक्त होण्यांत यशस्वी होणार नाहीत.
औदासिन्याबद्दल काय? विपश्यना हे बरे करते काय?
तरीही विपश्यनेचा उद्देश रोग बरा करण्यासाठी नाही. खरोखरच जो कोणी विपश्यनेचा अभ्यास करतो तो सर्व परिस्थितीत समतोल आणि आनंदी रहाण्यास शिकतो. परंतु गंभीर मानसिक दौर्बल्याची पार्श्वभुमी असल्यास ती व्यक्ती तंत्रज्ञान योग्यरितीने उपयोगात आणू शकणार नाही आणि अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. अशा व्यक्तिसाठी चांगली बाब म्हणजे त्याने आरोग्य व्यावसाईकाबरोबर काम करावे. विपश्यना आचार्य साधनेचे तज्ञ आहेत, मनोविकार तज्ञ नव्हेत.
विपश्यना लोकांना मानसिकदृष्ट्या असमतोल करील का?
नाही. विपश्यना तुम्हाला सजगता आणि मनाचा समतोलपणा शिकविते, म्हणजेच जिवनांत चढ उतार असून सुध्दा संतुलितपणा येतो. परंतु जर कोणी आपले गंभीर मानसिक प्रश्न लपवून ठेवत शिबीरांत आला तर त्याला तंत्र पध्दती समजण्यात अडचण किंवा अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी योग्य रीतीने आचरणात आणू शकणार नाही. म्हणूनच आम्हाला तुमचा पुर्व इतिहास कळणे आवश्यक असून त्यामुळे शिबीरापासून तुम्हाला लाभ मिळेल किंवा कसे याचा आम्ही निर्णय घेऊ .
विपश्यनेचा अभ्यास करण्यासाठी मला बुध्दीस्ट व्हावे लागेल का?
पुष्कळशा सांप्रदायिक व असांप्रदायिक लोकांना ही साधना उपयोगी आणि फायदेशीर दिसून आली आहे. विपश्यना ही जगण्याची कला आहे, जगण्याची शैली आहे. जरी हा बुध्दाच्या शिकवणीचा अर्क असला तरी हा संप्रदाय नाही; ही एक स्वतःच्या भल्यासाठी आणि दुसऱ्यांच्या भल्याकडे जीवन घेऊन जाणाऱ्या मानवी मूल्यांची मशागत आहे.
मला पूर्ण दहा दिवस का रहावे लागेल का?
विपश्यना ही पायरीपायरीने शिकविली जाते, अगदी शिबीराच्या अंतापर्यंत रोज एकेक पाऊल पुढे जाऊन शिकविली जाते. जर आपण लवकर गेलो तर आपण पुर्ण तंत्र शिकू शकत नाही आणि आपल्याला ह्या तंत्राचा लाभ मिळण्यापासून वंचीत रहाल. शिवाय नेटाने ध्यान केल्यामुळे शिबीरात भाग घेणारा ह्या पध्दतीचा संस्कार करतो की ज्यामुळे हे शिबीराची समप्ति परिपुर्ण होते. ही पध्दत पुर्ण होण्याआधी मध्येच व्यत्यय आणणे इष्ट नाही.
शिबीर मध्येच सोडण्यापासुन धोका आहे का?
मुद्दा असा आहे की लवकर जाणे म्हणजे स्वतःचा बदल अपूरा आहे. तुम्ही स्वतःला पुर्ण तंत्र शिकण्याची संधी देत नाही आणि म्हणुनच दैनंदिन जीवनांत यशस्वी उपयोग तुम्ही करु शकणार नाही. तुम्ही खऱ्या निर्णायक शेवटाला जाण्याआधी ह्या पध्दतीला मध्येच व्यत्यय आणता. एक दोन दिवस आधी घरी जाण्याने तुम्ही गुंतविलेल्या वेळेचा अपव्ययच होतो.
दहाव्या दिवसानंतर जेव्हा मौन सुटते आणि बोलायची परवानगी मिळते आणि गंभीर साधना समाप्त होते तेव्हा मी जाऊ शकतो का ?
पुन्हा सामान्य जीवनाकडे वळण्याच्या बदलासाठी दहावा दिवस अतिशय महत्वाचा आहे. ह्या दिवशी कुणालाही सोडून जाण्याची परवानगी मिळणार नाही.